रायगडाची सफर (अविस्मरणीय अनुभव )

महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला मानाचा

मुजरा

रायगडाची सफर (अविस्मरणीय अनुभव )

😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
रायगडाविषयी चौथीच्या पुस्तकात वाचले असेलच संपूर्ण इतिहास त्या पुस्तकात होता ..गडा किल्ल्याविषयी माहिती फोटो हे पेपरात वाचले होते ..पण प्रत्यक्षात रायगडाला जाण्याच्या प्रसंग वयाच्या तेविसाव्या वर्षी आला.ठरवून जायच म्हटल की होत नाही हा अनुभव प्रत्येकाला असतो पण अचानक ठरवल की सगळ्या गोष्टी जुळुन येतात..सोलापूरातून जर त्या वर्षी भरपूर तरूण कार्यकर्ते हे राज्याभिषेकाला रायगडाला जातात.तोच उत्साह,जोश हि कोणत्याही वर्षी तसुभरही कमी होत नाही..त्याच जोशाने मी माझा मिञ सागर आणि अजुन दोघे जणानी निघायच अस ठरवल..सात जुन रोजी महाराजाचा तारखेनुसार राज्याभिषेक असतो आणि तिथीनुसार वेगळा राज्याभिषेक असतो ..अस फक्त जगातल्या एकमेव राजाच्या बाबतीत होत असेल..

     आम्ही चौघा मिञांनी ठरवल ..आणि दोन चार कपडे ..टिशर्ट आणि न्याहारी आणि थोडेसे पैसे घेऊन तयार झालो ..डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या ,पाण्याची बाटली अशा गोष्टी  बॅग मध्ये घेतल्या..आणि सागरची , महेश आणि रमेश यांची तयारी झाली होती..दोन गाड्या होत्या ..डबलशीट ..भगवा गंध लावला, पाठीवर बॅग टाकली आणि गाडीची किक मारली की एकच जयघोष चौघानी केला छञपती शिवाजी महाराज की जय ………उत्सुकता ,जोश,शरीरात भिनला होता ..एकच इच्छा होती रायगडी पोहोचणे …पण अजून खूप उशीर होता ..आता कुठे प्रवास चालू होता ..सोलापूरातून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आमचा प्रवास चालू झाला ..सोलापूर पुणे चारपदरी महामार्ग इतका सुसज्ज आहे गाडी रोडवर नाही हवेत च चालतेय असा भास होतो .सोलापूर सोडून दहा ते पंधरा मिनिट झाले नाही तोपर्यत जोरात पाऊस चालू झाला ..आडोसा बघेपर्यतच आम्ही पूर्ण भिजून ओलेचिंब झालो ..त्यातच वारा सुटला ..गारवा लागण्यास सुरवात झाली…तिथेच मोहोळ च्या अलिकडे असणार्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल टाकी फुल्ल केली आणि पुढ्च्या प्रवासास निघालो ..साधारण पंढरपूर ….ते फलटण या मार्गेच आम्ही जायच ठरवल ..तब्बल तीन तासाच्या प्रवासा नंतर सात साडेसात च्या सुमारास आम्ही वेळापूर याठिकाणी पोहोचलो ..थकलो होतो पण जोश कायम होता ..तिथेच एका टपरीवर चहा घेतला आणि सगळा थकवा कुठे निघून गेला माहित नाही..आणि आम्ही आता तेथून निघणार एवढ्यात रमेश च्या गाडीची चावी हरवली आता झाली की पंचाईत?
तिथे आम्ही खूप शोधाशोध केली पण चावी काही सापडली नाही.आणि  ..लगेच मेकॅनिकला बोलवून लाॅक हे अनलाॅक केले आणि तेथून आम्ही पुढ्च्या प्रवासास निघालो ..गाडीवर गप्पा गोष्टी होत होत्या ..आणि याच रोडने जाणार्या गाड्या दिसत होत्या ..सगळ्या गाड्यावर भगवे झेडे..स्वराज्याच प्रतिक वाटत होत्या …वेळापूर,,,नातेपुते..यामार्गे आम्ही ठिक दहा साडेदहाच्या सुमारास …फलटण ला पोहोचलो ..अजून खुप प्रवास बाकी होता..जेवणाची वेळ झाली काय होवून गेली होती ..पण इच्छित स्थळी गेल्याशिवाय थांबायच नाही अस ठरल होत..फलटण मध्ये आम्ही चहा आणि बिस्कीटे घेतली पोटाला थोडा आराम मिळाला..राञीचे दहा वाजले होते पुढ निघायच की इथेच मुक्काम करून सकाळी निघायच ..या बाबतीत एकमत झाल ..पुढे जाऊन भोर ला मुककाम करू अस ठरल ..तरी दीडशे किमी अंतर पार करणे गरजेचे होते..जय भवानी जय शिवाजी करत आम्ही फलटण कडून शिरवळ  कडे कूच केली ..
      साधारण राञ जशी पुढे सरकत होती तसाच काळोख दाटत होता..गारवा वाढला होता ..आम्ही  स्वेटर या गोष्टी घेतल्या नव्हत्या…आणि गारवा लागत होता .गाडी साठ ते सत्तरच्या मध्येच होती ..रस्ते चकाचक होते ..काहीच आवाज नाही …फक्त आमच्या दोन गाड्याची हेडलाईट चमकत होती…आजूबाजूला अंधार..हलकीशी भीती वाटत होती …पण गप्पा आणि चेष्टेमध्ये रस्ता काही प्रमाणात पुढे सरकला …विचारत आणि माहिती घेऊन आम्ही रोडने जात होतो ..बारा वाजले पण शिरवळ काही येईना ..अंदाज पण येईना किती दूर आहे..त्यातच एक फलक दिसला शिरवळ 10  किमी ..आमच्या सगळ्याच्या जीवात जीव आला ..कारण खुप प्रवास झाला होता आणि दहा ते पंधरा मिनिटाचे फक्त दोन ब्रेक घतले होते संपूर्ण वेळ गाडीवरच….तेथून शिरवळ मध्ये गाडी आली..आम्ही लाॅज वर गेलो …आणि ..तिथे फ्रेश होऊन जेवण केले ..राञीचे दोन वाजत आले तरी उत्साह होता कारण उद्या रायगड पाहायचा होता..बाहेर हलकासा पाऊस चालू झाला होता ..चादरीची ऊब जाणवत होती ..
       सकाळचे सहा वाजले …फ्रेश होऊन आम्ही सात वाजता भोर च्या दिशेने निघालो ..सातारा पुणे हायवेवर गाड्याची वर्दळ असते ..तेथूनच भोर फाटा लागतो ..विचारत आम्ही भोरच्याजवळ होतो..भोर मध्ये चहा घेतला आणि नाष्टा करण्यासाठी थांबलो असता पाऊस चालू झाला.पाऊस कमी होई पर्यत थांबणे शक्या नव्हते कारण रायगड अजून 130 किमी होते ..दुपारपर्यत तरी रायगडाच्या पायथ्याशी असू अस नियोजन होत..हलकासा पाऊस कमी झाला ..दोन्ही गाड्याच्या 
जाताना भाटेघर धरण लागते ..पायथ्याला भाटेघराचे पाणी दिसते आणि वर मोठे डोंगर…अगदी प्रसन्न वातावरण ,धुके पसरलेले सगळ्या रस्त्यावर गवतावर पाणीच पाणी ..सुर्यदेव उगवले असले तरी आठ वाजता सुदधा प्रकाश पडत नव्हता ..वाटेत चिखल होता ..एखादी मधून टमटम जात असत..विरळ लोकसंख्येच्या प्रदेशामधून आम्ही जात होतो..जांभळाची ,बोराची झाडे ..बागा,आणि सगळी कडेला हिरवाईने नटलेल प्रदेश सुखाऊन जात होत ..हे सगळ बघत ..एखाद्या ठिकाणी फोटो काढत ..सगळ्या गोष्टी डोळ्यात साठवत आम्ही प्रवास करत होतो ..भोर घाट हा चाळीस किमी चा विस्तीर्ण घाटमाथ्याचा परिसर..मोठे डोंगर ,आणि लाल माती ..दिसली की आपण कोकणात एन्ट्री केली आहे आपल्याला लगेच जाणवत ..कोकणी या भागात राहणारे आदिवासी त्यांच राहणीमान खुपच वेगळ आहे ..ही सकळच्या वेळेस जांभूळ ,बोरे ..असा रानमेवा असणार्या गोष्टी विकायला थांबतात..गाडीला हात करून घेण्यासाठी विनवणी करतात…आणि याच लोकांनी या परिसरात सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत ..आम्ही प्रवास करत होतो ..एका ठिकाणी धबधबा दिसला .अंघोळ करून सुद्धा धबधब्यामध्ये नाचण्याचा मोह काय आवरेना ..मग काय…धबधब्यामध्ये तासभर तरी काय बाहेर आलोच नाही आणि पाऊस उलट जोरात चालू झाला ..मनात वाटल बरंच झाल धबधब्यातच जाऊन भिजलो ..नाहीतर असेना तसे भिजणारच होतो ..भिजलेले कपडे पिळून तसेच परिधान केले..कारण सुर्यदेवाला सुटटी होती ..पाऊस हा काय सोलापूरचा नव्हता हा कोकणातला पाऊस ….आपल्याला जाम ञास होणार हे माहितच होत ..तिथेच जवळ असणार्या टपरीवर चहा घेतला ..मस्त पैकी तरतरी आली ..विशालकाय डोंगर आणि या डोंगरामध्ये मस्त टिपटिप पाऊस आणि या मध्ये चहाचा झुरका …इसकी बातच.कुछ अलग है ..भावानो ही नशाच वेगळी ..ही सागून नाही अनुभवातूनच कळणार….मग आम्ही जरा फास्ट जाण्याचा निर्णय घेतला ..तासभर गाडी घाटातून कमी स्पीडने जात होती ..
   भोर घाटाच्या खाली येताना .पाॅईट आहेत .जिथे माकडे आहेत ..आणि फोटो साठी लोक थांबतात..ऊन चेहर्यावर येते आणि गर्द वनराईचा प्रदेश मनात धडकी भरवतो ..आपल्याला रस्त्यावरून जाताना भर दुपारी धडकी भरते ..राञी बाबत न बोलण चं बर…दरड कोसळणारा अस लिहलेला फलक दिसला आम्ही तिथे थांबत नसू ..गाडी चालूच होती ..बाराच्या सुमारास आम्ही महाड शहरात पोहोचलो ..थकवा जाणवत होता..पण रायगडाच्या पायथ्याला जाऊनच विश्रांती घेण्याचा निर्णय झाला ..
    महाड पासून आतमध्ये दहा ते पंधरा किलोमीटरवर पाचाड गाव आहे ..पाचाड गाव म्हणजे रायगडाचा पायथा .गाडी चालूच होती …विस्तीर्ण जंगलाचा भाग आणि  दहा दहा घराची सात आठ गावे ओलांडून आम्ही पाचाड या ठिकाणी पोहोचलो …तिथून विशाल रायगड दिसत होता …जोश तर खूप होता पण ..जोश जरा वेळ जपून ठेवणे फायद्याचे आहे ..चेहर्यावर थकवा जाणवत नव्हता ..पण शरीराने थकलो होतो ..सात वाजल्यापासून प्रवास चालू होता..एक वाजण्यास आले होते..सुर्यदर्शन आणि पाऊस असल्यामुळे वेळच कळत नव्हती ….
   पाचाड तिथे टपरीवर बसलो ..डबा काढला आणि ताव मारला तुम्हाला सांगतो .तीन भाकर्या पोटात गेल्या..एवढी भूक लागली होती …आणि गरमा गरम भजी घेतली ..कोकणी लोकांची चटणी आपल्या सोलापूरसारखी नसते..ती चटणी आंबट होती ..थोडीच चटणी खाल्ली ..भज्यावर ताव मारला ..आणि दोन चार तास विश्रांती घेऊनच रायगड चढण्यास जाऊ अस ठरल …
         आम्ही तिथेच धर्मशाळेत विश्रांती घेतली ..तुम्हाला सांगतो शरीराची एक नस अशी नव्हती ..जी ठणकत नसे ..शरीराला खूप थकवा आला होता .दोन दिवसाचा प्रवास आणि त्यात पाऊस आणि वेळेवर जेवण नसणे झोप नसणे यामुळे थकलेलो आम्ही कधी झोपलो कळालेच नाही ..मिञ आला ..अरे ऊठ ..चार वाजले ..जायच आहे ..
मी म्हणतोय ..अरे राहूदे उद्या परवा जाऊ आता काय शक्य ..नाही ..झोपच एवढी लागली होती .काय कळत नव्हत ..
            पटकन उठून आणि आवरून आम्ही तयार झालो ..पाण्याची बाटली आमि नॅपकीन ..आणि इतर गोष्टी सोबत घेतल्या आणि बॅग आम्ही तिथेच धर्मशाळेत ठेवल्या..आम्ही निघालो ते प्रथम जिजाऊच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले ..जीजाऊची समाधी पाचाड मध्ये आहे ..आम्ही दर्शन स्थळापासून निघतोय जोरात पाऊस चालू झाला ..आणि आता थांबायच नाही …एकच जल्लोष चालू झाला ..जय भवानी ..जय शिवाजी ……आईच दर्शन झाल ..आता ओढ होती लेकाच्या भेटीची ..पाचाड पासून काय दिसत होत रायगड..अबबबब..आपला एखाद दोन खोल्याच घर असेल तर आपण किती रूबाब करतो ..महाराजाचा रायगड बघितला की वाटत …महाराजाचा किती रूबाब असेल …
इतक विशाल..काय असा गड आम्ही सर करणार होतो ..छाती फुलून आली होती..पाय काय म्हणतील ..शरीर काय म्हणेल याची पर्वा नव्हती ..आता फकत एकच ईच्छा होती..माझ्या राजाला भेटण्याची ..स्वराज्याच्या थोरल्या धन्याला भेटण्याची …ते चौथीच पुस्तक सर…पणे..डोळ्यासमोरून गेल ..अरे ज्या गोष्टी पुस्तकात वाचल्या त्या प्रत्यक्षात पाहत होतो.रायगडाच्या पायथ्याला येऊन महाराज आऊसाहेबाच दर्शन घेत असत ..म्हणजे ही रायगडाची माती  डोक्यावर लावली …तरी इथे आल्याच सार्थक झाले ..तो सगळा काळ आठवत होता..प्रचंड उत्साह होता साधारण साडेपाच वाजण्याचा सुमार होता ..पाऊस चालू होता ..वरूणराजा जणू रायगडावर पुष्प वर्षाव करतोय अस वाटत होत..रायगडाच्या पायथ्याशी गेलो ..आणि पहिली पायरीला डोक टेकवले ..आणि छाती गर्वाने फुलून आली महाराज या जन्मात येऊन …रायगडाची माती कपाळाला लागली सगळ मिळाल..कुठली मथुरा आणि काशी …..आणि पहिल्या पायरीला नमस्कार केला.. जय भवानी ..आणि जय शिवाजीचा नारा दिला..आणि चढाई करण्यास सुरवात चालू झाली ..नारे देत देत ..एकमेकांकडे जोशाने पाहून..आम्ही एकमेकाना आत्मविश्वास देतो होतो..पाय दुखत होत ..घाम येत होता ..दम लागत होता ..पण जोश आणि उत्साह या समोर बाकीच्या गोष्टी क्षुल्लक होत्या.धबधबे चालूच होते ..वाट निमुळती होती ..झाडाच्या फांद्या मध्ये आडव्या येत होत्या ..वरून खाली बघितल की ..काळजात धस्स होइ ..वरून खाली काय दिसत नसे ..विशालकाय डोंगरातून धुके बाहेर येताना दिसत असे ..थंडी वाजत होती ..पाऊस होताच ..आणि सगळे कपडे भिजलेले….पण जोश काय कमी नव्हता ..एवढ्या सगळ्यामध्ये शरीरात घामाच्या धारा चालूच…पाणी सोबत घेतल होत त्यामुळे थोड पाणी पिऊन चढाई चालूच..आम्ही थांबत नव्हतो ….हुशशश..करत आम्ही एकदाच गडाच्या माथ्यावर पोहोचलो…एकदाच खाली बसलो ..तर छातीत धकधक चालू होती …सगळेजण खाली बसलो …सुर्य मावळती कडे झुकला होता ..अंधार झाला होता..थोड पाणी पिऊन ..दहा मिनिटे बसलो ..आणि ..नाष्टा मिळत होता त्या ठिकाणी गेलो ..
 रायगड प्रतिष्ठान आणि त्याच्यांशी सलग्नित अशा 120 संस्था आहेत त्या राज्याभिषेकाच नियोजन करतात..तेथे येणार्या सगळ्या सुविधा पोहोच करतात..आणि शिवभक्ताना अडचण येणार नाही याची काळजी घेतात..अगदी शिस्त बद्ध पद्धतीने नाष्ट्याचे वाटप चालू होते ..तेथून आम्ही महाराजच्या दरबारात गेलो …
      महाराजांचा दरबार हा रोशनाईने फुलून गेला होता ..महाराज्याच्या मागे रंगबेरंगी फुलाच्या माळा सजवून ठेवल्या होत्या ..राज्याभिषेकासाठी वाईचे पंडित आणि त्याचे सहकारी आले होते..मुसळधार पाऊस चालू होता ..पण प्रत्येक आपापली कामे चोख बजावत होता..अगदी खराखुरा 1600 चा महाराजांचा  काळ डोळ्यासमोर उभा राहिला ..सगळा परिसर भगवामय…वरूणराजा सुद्धा थोरल्या धन्याच्या राज्याभिषेकासाठी ..किती वेळापासून बरसत होता ..भगवे फेटे घातलेले..शिवकाळच समोर उभा ठाकला होता ..सभामंडप भरून गेला होता …गर्दीत दाटीवाटीने सगळी मंडळी शांत उभी होती ..प्रत्येकाला आतुरता आपल्या राजाच्या राज्याभिषेकाची …होती ..
                   महाराजांसाठी पालखी सजवली होती..आणि त्या मध्ये महाराजाची मूर्ती बसवली होती ..फुलानी सजवलेली पालखी महाराजाच्या सिहासनासारखी दिसत होती ..पालखीच्या शेजारी मावळ्याच्या वेशात सगळे तरूण ..प्रचंड उत्साह आणि जोश होता ..जय भवानी जय शिवाजी एकच जयजयकार घुमला होता ….अतिशय वाजतगाजत महाराजाच्या पालखीचे …सभामंडपात आगमन झाले ..
           पालखीतील मूर्ती सभामंडपाच्या सिहासनासमोर ठेवली ..वाईच्या पंडितानी मंञोच्चाराच्या घोषात अभिषेकास सुरवात केली ..दही ,दूध,मध,नाणे या गोष्टीनी महाराज्याच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला ..एकच जयघोष झाला …श्री छञपती शिवाजी महाराज की जय………..तुतार्या वाजल्या ..ढोल नगारे वाजू लागले ……सगळ्या जगाला कळाले …मराठा राजा …….छञपती झाला ……
                 राज्याच्या मुर्तीची तुला करण्यात आली ..पुस्तके,साखर,नाणी ,या गोष्टीचा सामावेश होता..त्यानंतर आई तुळजाभवानीच्या नावाचा जागर चालू झाला …त्यावर सगळ्यानी ठेक धरला …त्यानंतर प्रसाद वाटण्यात आला ..कार्यक्रम चालूच होते .पण पाऊस जोरात वाढला …आणि आम्ही तेथे लगेच छञपतीच्या समाधीचे दर्शन घेऊन …गडाच्या पायथ्याशी परतण्याचा निर्णय घेतला ..
              पाऊस काही थांबायचे  नाव घेत नव्हता ..अंधार दाटला होता..मोबाईलची टाॅर्च घेऊन आम्ही खाली पायर्या उतरत होतो ..तासाभरात आम्ही पायथ्याला पोहोचलो ..आणि राञीचे एक वाजले होते .धर्मशाळेत आराम केला आणि सकाळी रायगडाचा निरोप घेऊन …रायगड डोळ्यात साठवून ..परतीच्या वाटेने निघालो परत येण्यासाठी